🪨 ताम्रपाषाण युग (Chalcolithic Period)
नवपाषाण युगानंतर ताम्रपाषाण युग अथवा ताम्रपाषाण संस्कृतीची सुरुवात झाली. या काळात दगडासोबत तांब्याचा वापर वाढल्यामुळे या युगाला "ताम्रपाषाण युग" असे म्हणतात.
धातूंपैकी तांबे हा पहिला वापरलेला धातू होता. त्यामुळे या युगातील संस्कृतीला "दगड व तांब्याचा वापर करणारी संस्कृती" असे संबोधले जाते.
तांत्रिकदृष्ट्या, हडप्पा संस्कृतीच्या कांस्ययुगापूर्वी हे युग असले तरी बहुतेक ताम्रपाषाण संस्कृती हडप्पा नंतरच्या कालखंडातील आहेत.
🌾 ताम्रपाषाण युगातील जीवनशैली
- मुख्य व्यवसाय: शेती व पशुपालन
- पीके: गहू, तांदूळ, बाजरी, मसूर, उडीद, मूग
- पाळीव प्राणी: मेंढ्या, शेळ्या, गायी, म्हशी, डुक्करे
- शिकार: हरण
- उंटांचे अवशेष आढळले पण घोडा परिचित नव्हता
🏠 वसाहती आणि वास्तव्य
या काळातील लोक लहान गावांमध्ये समूहाने राहत असत. त्यांची वस्ती नद्यांच्या आणि डोंगराच्या आसपास होती. भाजलेल्या विटांचा वापर फारसा नसायचा, कदाचित तंत्रज्ञानाची माहिती नव्हती.
🛠️ व्यवसाय व कला
- कपडे शिवणे
- टेराकोटा खेळणी व मूर्ती तयार करणे
- कुंभारकाम व धातूकाम
- हस्तिदंत व चुना तयार करणे
भांड्यांवर काळा व लाल रंग असून ते चाकावर बनवले जात. काही भांड्यांवर पांढऱ्या रेषांनी अलंकरण केलेले असायचे.
🕉️ धार्मिक श्रद्धा
- मातृदेवतेची पूजा करणाऱ्या स्त्री मूर्ती आढळतात
- बैल हा धार्मिक प्रतीक म्हणून वापरला गेला असावा
🏞️ भारतातील प्रमुख ताम्रपाषाण वसाहती
✅ दक्षिण-पूर्व राजस्थान
- आहार (उदयपूर)
- गिलुंड (राजसमंद)
✅ पश्चिम महाराष्ट्र
- जोर्वे
- नेवासा, सोनगाव, दायमाबाद (अहमदनगर)
- चांदोली (कोल्हापूर)
- इनामगाव (पुणे) – या काळातील सर्वात मोठी वसाहत
✅ पश्चिम मध्यप्रदेश
- मालवा
- कायथा (मंडला)
- एरण (गुना)
0 टिप्पण्या